Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 6 September 2022

एन.एम.एम.एस. -निकाल

 *एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये विंचूर विद्यालयाचे १३ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र.....*

      विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे या वर्षी एन.एम.एम.एस. परीक्षेत २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी १३ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. या प्रत्येक विद्यार्थ्यास पुढील चार वर्षासाठी प्रतिवर्षी १२००० /- रु प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे. विद्यालयातील पूर्वा डुंबरे, समिक्षा ढवण, शुभम नागरे, प्रज्ञा राऊत, श्रुती डुंबरे, जान्हवी डुंबरे, शुभम मघाडे, मानवी महाले, साहिल दरेकर, प्रणाली थोरात, गौरव जेऊघाले, जयेश वकारे व संस्कृती जोंधळे या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, विभागप्रमुख श्री.सारुक्ते यु.ए. मार्गदर्शक शिक्षक व्ही.सी.भोसले, ए.वाय.सावळे, ए.ए.पवार, ए.एस.वानखेडे, ए.जी.खरात यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथजी शिंदे, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष कैलास सोनवणे व सदस्य पंढरीनाथ दरेकर जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल भाऊ मालपाणी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, ग्रामस्थ, पत्रकार, माजी विद्यार्थी, डॉक्टर असोसिएशन तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, लाईफ मेम्बर आर.के.चांदे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





































No comments:

Post a Comment