Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 6 September 2022

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

 *विंचूर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ......*

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत बाह्य तज्ञ मार्गदर्शक म्हणून ज्ञानसागर अकॅडमी चे सागर जमधडे सर यांनी स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन केले. शालेय जीवनात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अशा विविध स्पर्धा परीक्षा जसे नवोदय, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, मंथन, ऑलिम्पियाड, सी. व्ही रमण परीक्षा यांची पूर्व तयारी, पाठ्यक्रम, त्यासाठी आवश्यक पात्रता व त्यापासून मिळणारे लाभ याविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य देवढे एन.ई. होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन पाटील ए.एच. यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य  शिंदे आर.व्ही., पर्यवेक्षक जोरे डी.टी., जोपळे के.जी., लाईफ मेंबर चांदे आर.के. गुरुकुल प्रमुख निकम एम.एस. व विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी भोसले व्ही.सी. यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुरूकुलच्या सर्व वर्गशिक्षकांचे सहकार्य लाभले.




No comments:

Post a Comment