Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 15 September 2022

हिंदी दिन

 *विंचूर विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.....*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी हिंदीतील प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद मुंशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे यांनी हिंदी दिनाचे महत्व विशद केले. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी हिंदी दिनानिमित्त उपमुख्याध्यापक शिंदे आर.व्ही., पर्यवेक्षक जोरे डी.टी., के.जी.जोपळे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.









No comments:

Post a Comment