Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 15 September 2022

आरोग्य तपासणी

 *विंचूर विद्यालयात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी..*

रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय निफाड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल जाधव व डॉ.शुभांगी भारती यांनी इयत्ता 5 वी ते 7 वी च्या 787 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व आरोग्याच्या उत्तम सवयींबद्दल योग्य मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक शिंदे आर.व्ही., पर्यवेक्षक जोरे डी.टी., के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर चांदे आर.के, विभागप्रमुख श्रीम.ए.एम.पवार, विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे आभार मानले.




No comments:

Post a Comment