Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, 15 September 2022

शालेय गणपती विसर्जन

 *विंचूर विद्यालयात गणरायांना निरोप..*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात लेझीम पथकाच्या मिरवणुकीसह उत्साहपूर्ण वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रसादाचे आयोजन व शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले. लेझीम पथकाच्या सहाय्याने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व मुला-मुलींनी सहभागी होत गणरायांना घोषणा व आरतीद्वारे भावपूर्ण निरोप दिला. आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक शिंदे आर.व्ही., पर्यवेक्षक जोरे डी.टी., के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर चांदे आर.के, उपशिक्षक सरोदे पी.ए., भोसले व्ही. सी., वळवी ए.टी., शिंदे एस.व्ही., कांबळे व्ही.जे.,  बोरसे एन.बी., शेजवळ ए.डी., पाटील ए.एच., सारूक्ते यु.ए., चितुडकर ए.डी., सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.










No comments:

Post a Comment