Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 7 September 2022

शिक्षक दिन :- 5 सप्टेंबर

 *विंचूर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा - "विद्यार्थी बनले शिक्षक"*


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता १० वी च्या वर्गातील उस्फुर्त विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिपाई म्हणून एक दिवस शाळेचे संपूर्ण कामकाज बघितले. इयत्ता १० वी मधील विद्यार्थी यश आघाव – मुख्याध्यापक, साक्षी पुंड – उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक म्हणून श्रद्धा निकम आणि साक्षी बिबे यांनी कामकाज पाहिले. विद्यार्थी शिक्षकांनी प्रथम सत्रात अध्यापनाचे कामकाज पार पडले. त्यानंतर सभेचा व सत्कार समारंभ घेण्यात आला. सर्वप्रथम साक्षी बर्डे हिने अध्यक्ष निवडीची सूचना मांडली त्यास अनुजा गाडेकरने  अनुमोदन दिले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस्विनी थोरात हिने केले. त्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थी शिक्षकांनी गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच याप्रसंगी  सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास  थोर समाजसुधारक, नेते व क्रांतिकारकांच्या जवळपास 30 प्रतिमा भेट देण्यात आल्या. त्यानंतर मंथन शिरसाठ, साक्षी पुंड, अभिषेक वाघ, ओंकार जाधव, यश आघाव, प्रतिक्षा केदारे, जयश्री लांडबले, वैशाली लांडबले, रोशनी पवार यांनी शिक्षक दिनानिमित्त आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ.खरात एस.ए. यांनी शिक्षक प्रतिनिधी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे उपमुख्याध्यापक शिंदे आर.व्ही. व पर्यवेक्षक जोरे डी.टी., के.जी.जोपळे यांनी कौतुक केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. माध्यमिकसाठी संस्थेचे लाईफ मेंबर राजेंद्र चांदे व उपशिक्षक पंकज सरोदे तर उच्च माध्यमिक वर्गासाठी प्राध्यापक जाधव बी.के. व गंधे एस.व्ही. यांनी शिक्षक दिनाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दीपिका उगले व प्रांजल जेऊघाले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राची खापरे हिने केले.




















































































































No comments:

Post a Comment