Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 6 September 2022

माजी विद्यार्थी प्रविण पाटील- शास्त्रज्ञ

 *विंचूर विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रविण पाटील- शास्त्रज्ञ*



रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूरचे माजी विद्यार्थी प्रविण रंगराव पाटील यांची एनआयटी पटना बिहार येथे शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. त्यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर, बी.टेक. ऍग्री.- के के वाघ कॉलेज, नाशिक, आय.आय.टी. एम.टेक.- खडकपूर व पीएचडी रुरकी येथे पूर्ण केले. विद्यालयासाठी ही अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी यावेळी सांगितले. या यशाबद्दल स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ व सर्व सदस्य, तसेच जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, लाईफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, माजी शिक्षक प्रविण ढवण, व्ही.व्ही.काकळीज, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment