Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 1 October 2022

शालेय विज्ञान प्रदर्शन

 विंचूर विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न....*


                  विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना प्रेरणा व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर आण्णा व ए.पी,जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचे प्रयोग सादर केले. याप्रसंगी विज्ञान उपकरणे, खेळणी प्रदर्शन, पोस्टर प्रेझेंटेशन इत्यादी उपक्रमांच्या कक्षांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सर्व विविध कक्षांमध्ये जवळपास १५० हून अधिक उपकरणे प्रदर्शनासाठी मांडण्यात आली होती.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे याप्रसंगी मान्यवरांनी कौतुक केले. याप्रसंगी जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप चव्हाण, तसेच ज्ञानेश्वर गाडे, सोमनाथ निकम, सतीश शेलार, पी.के.जेऊघाले, अशोक दरेकर, शंकर दरेकर, विनायक जेऊघाले, प्रकाश गायकवाड, रोहित चौधरी, सोमेश्वर दरेकर, विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक शिंदे. आर.व्ही., पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, पालक, ग्रामस्थ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व विज्ञान व गणित शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन विभागप्रमुख सौ.दिघे व्ही. आर. यांनी केले






















No comments:

Post a Comment