Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 1 October 2022

सत्यशोधक समाज स्थापना दिन

 *विंचूर विद्यालयात सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात साजरा..*

    रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त व्याख्यान आयोजित केले गेले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. त्यानंतर सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते प्राध्यापक आर. टी. टिळेकर यांनी आपल्या व्याख्यानास "सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको कोणीही मध्यस्ती" या सत्यशोधक समाजाच्या ब्रीद वाक्याने सुरुवात करून महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या अनेक सत्यशोधक चळवळींची माहिती दिली. सत्यशोधक विचारसरणीने महाराष्ट्र भारावून गेला होता. या चळवळीतून रयत शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था, श्री. शिवाजी शिक्षण संस्था, कोल्हापूर शिक्षण संस्था व जनता शिक्षण प्रसारक संस्था या सारख्या अनेक शिक्षण संस्था उभारल्या गेल्या. अनेक समाजसुधारक व विचारवंतांनी सामाजिक , आर्थिक, राजकीय, शैक्षणिक कार्य करत समाज सुधारणेचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा परिचय त्यांनी आपल्या व्याख्यानात करून दिला. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, स्थानिक सल्लागार समिती सदस्य अनिल दरेकर, विद्यालयाचे प्राचार्य एन. ई. देवढे, उपप्राचार्य आर. व्ही. शिंदे, पर्यवेक्षक डी. टी. जोरे, के. जी. जोपळे, अमोल दरेकर, सानप सर, रोहित चौधरी, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे लाईफ मेंबर आर. के. चांदे यांनी मान्यवरांचे आभार मानले.














No comments:

Post a Comment