*कर्मवीरांच्या विचारांनी प्रगल्भ असे विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडवा- आम. छगन भुजबळ*
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंतीनिमित्त सभेचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रांगोळी व हस्तकला प्रदर्शन दालनांचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. ईशस्तवन व स्वागत गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे उपशिक्षक पंकज सरोदे यांनी अध्यक्ष निवडीची सूचना मांडली व त्यास प्राध्यापक आर.टी.टिळेकर यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले. स्थानिक सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य जगदीश जेऊघाले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी केले. तदनंतर उपस्थित अतिथींचा सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी तसेच सर्व मान्यवर पत्रकारांचा सन्मानचिन्ह, शाल, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जयदत्त होळकर, सुवर्णाताई जगताप व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. तदनंतर माजी उपमुख्यमंत्री आमदार छगनराव भुजबळ साहेब यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. तसेच आधुनिक काळातील विद्यार्थी हा कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारांनी प्रगल्भ व विज्ञाननिष्ठ असा घडावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. कैलास राठी यांनी आरोग्याच्या उत्तम सवयी तसेच निरोगी जीवनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, विंचूर ग्रामपंचायत सरपंच सचिन दरेकर, जनरल बॉडी सदस्य सोनार सर, पत्रकार, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व शिक्षक, रयत सेवक, विद्यालयातील विविध समित्यांचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के. चांदे व श्रीम.बी. आर. नागणे यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डी.टी.जोरे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




























































































































































































































No comments:
Post a Comment