Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 2 October 2022

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री

 *विंचूर विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन...*

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन. ई.देवढे, उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रतिमापूजन केले. विद्यालयातील विद्यार्थिनी प्रियंका माळशिकारे, ज्योती नागरे, श्रेया माळी, पल्लवी निकम, प्रणोती वाघ, आरती आजबे या विद्यार्थिनींनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ प्राध्यापक बी.के. जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले. याप्रसंगी संस्थेचे लाईफ मेंबर  आर. के. चांदे, ज्येष्ठ शिक्षक एस.पी. गाडेकर, एस.एम. पवार, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती उगलमुगले व साक्षी बिबे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन उपशिक्षक व्ही.सी.भोसले यांनी केले.




















No comments:

Post a Comment