Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 12 December 2022

उमेद शोध नाविन्याचा अंतर्गत प्रकल्पाची निवड

 *विंचूर विद्यालयातील विद्यार्थिनींच्या प्रकल्पाची उमेद शोध नाविन्याचा अंतर्गत निवड.....*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थिनी भक्ती शंकर दरेकर व सेजल संदीप काकड यांनी तयार केलेल्या प्रकल्पाची नासिक इंजीनियरिंग क्लस्टर व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद शोध नाविन्याचा अंतर्गत निवड करण्यात आली. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या कांदा साठवणुकीसाठीच्या बॅग्स या प्रकल्पाला जिल्ह्याच्या पहिल्या 12 प्रकल्पातून तृतीय क्रमांकाचे पाच हजार रोख रकमेचे बक्षीस प्राप्त झाले. तसेच नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर कडून योग्य ती टेक्नॉलॉजीसाठीची मदत व इन्वेस्टर अथवा पार्टनर देण्यासाठीचा करार झाला. यासाठी जिल्हा परिषद नाशिक यांनी सुमारे एक लाख रुपये प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी मंजूर केले. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष - काकासाहेब गुंजाळ, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी, उपाध्यक्ष - कैलास सोनवणे, सदस्य - जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, लाईफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे व के.जी.जोपळे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.








No comments:

Post a Comment