Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 12 December 2022

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

 *विंचूर विद्यालयाचे तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश...* 


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन केले. निफाड येथे आयोजित तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत 14 वर्षे, 17 वर्षे आणि 19 वर्षे वयोगटातील मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत विद्यालयाचे तीन संघ सहभागी झाले. यामध्ये 19 वर्षे वयोगटातील संघाने विजेतेपद पटकावले. तर 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने फायनल मध्ये उपविजेतेपद पटकावले. विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटातील संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. लासलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या 200 मी.धावणे मैदानी स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात कु.वैशाली शरद लांडबले तिने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. अमोल सोनवणे याची कुस्ती स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झाली. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक एस.डी.शिंदे, एन.सी.खोंडे, बी.एम. बैरागी, जे.एस.शिंदे, ए.वाय.सावळे, एम.पी.पाटील, एस.पी.चौधरी, जे.एस. सोनवणे, यु.ए.सारूक्ते, एम.आय.शेख, व्ही.पी. गावित यांचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनील मालपाणी उपाध्यक्ष कैलास सोनवणे सदस्य पंढरीनाथ दरेकर जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर विद्यालयाचे प्राचार्य एन. ई. देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, लाईफ मेंबर आर.के. चांदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी. जोपळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले.





No comments:

Post a Comment