Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 18 December 2022

सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथीनिमित्त फायर अँड सेफ्टी मार्गदर्शन

 *विंचूर विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथीनिमित्त फायर अँड सेफ्टी मार्गदर्शन* 

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट चांदवड यांच्या माध्यमातून फायर अँड सेफ्टी मार्गदर्शन आयोजित केले गेले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर. व्ही. शिंदे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समुपदेशक बी. एम. बैरागी यांनी सादर केले. सरदार पटेल यांच्या जीवनातील विविध घटनांची माहिती प्राध्यापक आर. टी. टिळेकर यांनी आपल्या भाषणात दिली. तर चांदवड महाविद्यालयाच्या प्राचार्य आशुमती लोहारकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आगीचे कारण व त्यापासून कसा बचाव करावा तसेच फायर आणि सेफ्टी या कोर्सची माहिती देत या नावीन्यपूर्ण करिअरची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. तसेच सुजित पेंढारे यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आगीचे प्रकार व त्यावर नियंत्रण कसे मिळवावे याचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्राध्यापक एस. एन. शेवाळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. के. जाधव, एस. व्ही. निकम, सी. व्ही. अहिरे, एस.पी गायकवाड, एस. व्ही. गंधे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.डी. शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. टी. ए.पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल प्राचार्य देवढे एन.ई. यांनी सर्वांचे अभिनंदन केले










No comments:

Post a Comment