Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday 18 December 2022

कलाकार व विद्यार्थी - शहाजहान मुकेरी

 *विंचूर विद्यालयात शहाजहान मुकेरी यांचे विद्यार्थ्यांना संगीत मार्गदर्शन...*

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे नटरंग कलापथक निफाड बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक शहाजहान सरदार मुकेरी यांनी विद्यार्थ्यांसमोर हाताचा कोपरा, नाक, जिभ व डोक्याने कॅसिओ वादनाद्वारे विविध भावगीत, भक्तीगीत, देशभक्तीपर गीते, शालेय कविता व बालगीतांचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांना संगीताविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख सौ.ए.ए.पवार यांनी केले.











No comments:

Post a Comment