Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 12 December 2022

महात्मा फुले पुण्यतिथी

 *विंचूर विद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन....*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. विद्यालयातील विद्यार्थिनी गायत्री गाढवे, रोशनी तांदळे, समीक्षा संधान, पायल वैराळ, अमृता खांदोडे या विद्यार्थिनींनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक के.जी. जोपळे यांनी देशाच्या जडणघडणीत विविध महापुरुषांच्या कार्याचे महत्त्व आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक डी.टी. जोरे, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी ड चे विद्यार्थी व वर्गशिक्षक एम.पी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोमल खांदोडे व अक्षरा शिंदे यांनी केले.


















No comments:

Post a Comment