Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 12 December 2022

विशाखा समिती मार्गदर्शन एडवोकेट ज्योती ठाकरे

 *विंचूर विद्यालयात विशाखा समिती अंतर्गत विद्यार्थिनींना मार्गदर्शन...*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींसाठी कायदेविषयक माहिती यासंबंधी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथींचा परिचय प्राध्यापिका एस.व्ही.निकम यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व व्याख्यात्या ॲडव्होकेट ज्योती ठाकरे यांनी विद्यार्थिनींना समाजातील होणारे वेगवेगळे गुन्हे व त्यासाठी असणारे विविध कायदे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक एस.एन.शेवाळे, आर.टी.टिळेकर, एस.डी.शिंदे व एस.बी.मुदगुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका एस.पी.गायकवाड व प्राध्यापिका सी.व्ही.आहिरे यांनी आभार प्रदर्शन केले.







No comments:

Post a Comment