Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 12 December 2022

शंकरराव जेऊघाले यांचा सत्कार

 *विंचूर विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य शंकरराव जेऊघाले यांचा सत्कार...*

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर च्या स्थानिक सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य श्री.शंकरराव गेणूजी जेऊघाले यांची राष्ट्रमाता इंदिरा गांधी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित विंचूरच्या चेअरमन पदी व राजेश भडांगे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल विद्यालय व सर्व सल्लागार समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य अनिल दरेकर तसेच ज्ञानेश्वर गाडे, विनायक जेऊघाले, ज्ञानेश्वर देसले, विष्णू साळुंके, मनीषा गायकवाड, वेणुनाथ क्षिरसागर, विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.







No comments:

Post a Comment