Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 12 December 2022

डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

 *विंचूर विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन....*

 विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी प्रणव पवार, अनुकल्प वानखेडे, अभिषेक वाघ,  प्रीती कदम, कावेरी भडांगे प्रतीक्षा केदारे, नेहा सोनवणे यांनी बाबासाहेबांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, एस.पी.गाडेकर, एस.एम.पवार, व्ही.एस.कुलकर्णी, व्ही.आर.दिघे, जे.व्ही.काळे, जे.एस.शिंदे, एस.ए.खरात, ए.ए.पवार, बी.आर.नागणे, के.एम.निकम, जी.के.केंग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल मुदगुल व आभार प्रदर्शन इरम शेख यांनी केले.











No comments:

Post a Comment