Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 12 December 2022

पवार साहेब कृतज्ञता सप्ताह व्याख्यान- खेमराज कोर

 *शरद पवार साहेब हे खरे जनतेचे कैवारी - खेमराज कोर*


रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदरावजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्ष निवडीची सूचना उपशिक्षक पंकज सरोदे यांनी मांडली व त्यास उपशिक्षिका व्ही.आर. दिघे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. तदनंतर उपस्थित मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी विद्यालयातील क्रीडा, वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.  कु. साधना निकम या विद्यार्थिनीने पवार साहेबांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ शेतकरी नेते खेमराज कोर यांनी "पवार साहेब हेच खरे जनतेचे कैवारी आहेत." राजकारण व समाजकारणात शरदचंद्रजी पवार साहेब कार्य अतुलनीय असल्याचे आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमासाठी विनोद पाटील, जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, तसेच सरपंच सचिन दरेकर, ज्ञानेश्वर गाडे, शंकरराव दरेकर, सोमनाथ निकम, पंढरीनाथ जेऊघाले, अशोक दरेकर , दिलीप चव्हाण, बापू सोदक, रणजीत गुंजाळ, सोमनाथ बिबे, ऋषिकेश ठुबे, प्रविण ढवण, आबासाहेब दरेकर, आरती जाधव, मालती जाधव, वर्षा वाघ तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लाईफ मेंबर आर.के. चांदे व आभार प्रदर्शन पर्यवेक्षक डी.टी.जोरे यांनी केले.





















No comments:

Post a Comment