Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 12 December 2022

तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी स्पर्धा

 *विंचूर विद्यालयाचे तालुकास्तरीय दिव्यांग स्पर्धेत सुयश .....*

वैनतेय विद्यालय निफाड येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी क्रीडा स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. रनिंग स्पर्धेत इयत्ता पाचवीतील विद्यार्थी प्रणव सुनील पवार याने प्रथम क्रमांक, चमचा लिंबू स्पर्धेत इयत्ता सहावीतील विद्यार्थी कृष्णा गणेश नागरे याने प्रथम क्रमांक तसेच संगीत खुर्ची स्पर्धेत इयत्ता सातवीतील विद्यार्थी श्लोक छगन सांगळे याने द्वितीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विशेष शिक्षिका भामरे मॅडम, विभाग प्रमुख सौ.निकम के.एम. यांचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य - पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, जी.टी.जेऊघाले, शालेय विविध समित्यांचे कार्यकारीणी सदस्य, ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी. जोरे, के.जी. जोपळे, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.





No comments:

Post a Comment