Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 24 January 2023

वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम


*विंचूर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न............*

विंचूर, दि.30 डिसें.2022- येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सांस्कृतिक विभागाद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने संपन्न झाले.   या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनील भाऊ मालपाणी विंचूर ग्रामपालिका सरपंच सचिन दरेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते पांडुरंग राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, भवानी देवीची गीते, धनगरी नृत्य, विविध देशभक्तीपर गीते, कोळीगीत, शेतकरी गीत, बेटी बचाव, शिवरायांचा पाळणा, भारुड, पोवाडा, गायन, नाटिका, असे विविध नृत्य आविष्कार सादर केले. परीक्षक म्हणून डी.आर. गायकवाड व जे.डी. आहिरे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी सल्लागार समिती सदस्य पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, पालक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, पी.के.जेऊघाले सर, विनायक जेऊघाले, अशोक दरेकर, सद्दाम शेख, आरती जाधव, जरीना मोमीन ग्रामस्थ, हितचिंतक, माता-भगिनी, पत्रकार, विद्यार्थी,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के.चांदे, सौ.व्ही.आर.दिघे, सौ. एस.ए.खरात व श्रीम. ए.वाय. सावळे यांनी केले. उपस्थित सर्व आणि कार्यक्रमासाठी योगदान दिलेल्या मान्यवरांचे उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे व के.जी.जोपळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

*विंचूर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.................*
विंचूर , ३१ डिसेंबर :- विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित लासलगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. राहुल वाघ साहेब, पंचायत समिती निफाड गटशिक्षणाधिकारी तुंगार साहेब, विस्तार अधिकारी गायकवाड साहेब, या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग, तालुका, जिल्हा, विभाग, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा व रयत गुरुकुल प्रकल्पातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व मेडल अशा स्वरूपात पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमातील वैयक्तिक व सामुहिक प्रकारातील विजेते संघ व वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली. विद्यालयाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार इयत्ता १० वी मधील विद्यार्थी तनुश्री दरेकर व अभिषेक वाघ यांना पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमासाठी यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी सर्व पारितोषिके स्वर्गीय मातोश्री सुशीलाबाई मालपाणी यांच्या स्मरणार्थ उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिल मालपाणी यांच्या वतीने दिली गेली. तसेच कार्यक्रमास आर्थिक हातभार लावणारे सर्व दानशूर व्यक्तींचे यावेळी आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब जेऊघाले, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे (रुई), स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पंढरीनाथ दरेकर, जगदीश जेऊघाले, अनिल दरेकर, शंकर दरेकर, विनायक जेऊघाले, पंढरीनाथ जेऊघाले, गोपीनाथ ठुबे, ज्ञानेश्वर गाडे, राजाभाऊ दरेकर, राजाराम दरेकर, अशोक दरेकर, सोमनाथ निकम, पत्रकार, किशोर पाटील, संदीप शिरसाठ, दिपक घायाळ, भाऊसाहेब हुजबंद, सुनिल क्षिरसागर, प्राथ.विद्यामंदिरचे मुख्याध्यापक खैरनार सर, उपमुख्याध्यापक,  पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.के.चांदे, व्ही.आर.दिघे, एस.ए.खरात व ए.वाय.सावळे यांनी केले.






































































































































 

No comments:

Post a Comment