Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 24 January 2023

विठ्ठल रामजी शिंदे-पुण्यतिथी

 *विंचूर विद्यालयात विठ्ठल रामजी शिंदे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन...*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सानिका क्षिरसागर हिने केले. विद्यार्थिनी पूनम बुचकुले, श्रावणी थोरात, आरती ठुबे यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता आठवी ड चे विद्यार्थी व वर्गशिक्षिका सौ.ए.ए.पवार यांनी केले.








No comments:

Post a Comment