Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 24 January 2023

शिष्यवृत्ती परीक्षा - सुयश

 *विंचूर विद्यालयाचे सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ......*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत आयोजित इ. ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये डुंबरे पूर्वा भरत, भोसले शरयू जगदीश, नागरे शुभम लक्ष्मण, ढवण समीक्षा उमेश हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. त्याचप्रमाणे इ. ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खोंडे दिव्येश राहुल, आहेर श्रेयस सचिन,  खर्डे आयुषी योगेश हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्रीम.नागणे बी.आर., श्रीम.पवार ए.एम., सौ.निकम के.एम., चितुडकर ए. डी., सौ.शिंदे जे.एस. , सावळे ए. वाय., खरात ए.जी., वानखेडे ए.एस., भोसले व्ही.सी., सारुक्ते यु.ए. तसेच विभागप्रमुख सौ.सोनवणे जे.बी. व सौ.पवार ए.ए. यांचे स्थानिक सल्लागार शिक्षण समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, व सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, बाळकिसन मालपाणी, जगदीश जेऊघाले, गंगाधर जेऊघाले, काशिनाथ शेवाळे  तसेच विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे व के.जी.जोपळे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment