Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 24 January 2023

संत गाडगेबाबा पुण्यतिथी

 *विंचूर विद्यालयात संत गाडगेबाबांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन....*

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये संत गाडगेबाबांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे होते. विद्यार्थिनी डॉली भदाणे व पायल मुदगुल यांनी गाडगेबाबांच्या जीवन कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, लाईफ मेंबर आर.के. चांदे, ज्येष्ठ शिक्षक एस.पी.गाडेकर, एस.एम.पवार, सौ.व्ही.आर. दिघे, श्रीम.व्ही.एस.कुलकर्णी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत मुदगुल व आभार प्रदर्शन स्नेहल जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी फ चे विद्यार्थी व वर्गशिक्षक एम.आय. शेख यांनी केले. सकाळ सत्रात उच्च माध्यमिक वर्गांसाठीसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे प्राध्यापक एस. एन. शेवाळे यांनी भूषविले. तर प्राध्यापक आर. टी. टिळेकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. प्राध्यापक बी. एम. बैरागी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तर भाग्यश्री पवार आणि साधना निकम या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास बी.के.जाधव, एस.डी.शिंदे, टी.ए.पवार, एस.पी.गायकवाड, सी.व्ही.अहिरे, एस.व्ही.गंधे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.










No comments:

Post a Comment