Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 24 January 2023

राष्ट्रीय गणित दिवस

 *व्यवहाराचा पाया म्हणजे गणित - पर्यवेक्षक जोरे.डी.टी.*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती *राष्ट्रीय गणित दिवस* म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शुभम शेलार याने अध्यक्ष निवडीची सूचना मांडली व त्यास यश दरेकर याने अनुमोदन दिले. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी याप्रसंगी रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सार्थक नागरे याने केले. याप्रसंगी विद्यार्थी सुशिल औताडे व मंथन सहानखोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.टी.जोरे यांनी गणित दिनाचे महत्त्व व व्यावहारिक जीवनाचा पाया म्हणजे गणित हे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक आर. व्ही. शिंदे, पर्यवेक्षक के.जी. जोपळे, लाईफ मेंबर आर.के.चांदे, विद्यालयातील सर्व गणित शिक्षक एस.पी.गाडेकर, ए.टी.वळवी, एस.व्ही.शिंदे, एम.आय.शेख, एम.एस. निकम, सौ.ए.ए.पवार, सौ के.एम.निकम, सौ.आर.पी.सरोदे, श्रीम.बी.आर.नागणे, ए.डी. चितुडकर, श्रीम.ए.वाय.सावळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश आघाव व आभार प्रदर्शन ओमकार जाधव या विद्यार्थ्यांनी केले.



















No comments:

Post a Comment