Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 15 April 2023

12 वी निरोप समारंभ

 *विंचूर महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..* 

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे इयत्ता बारावी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले गेले. त्यानंतर घुमरे तनुजा हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. निरोप समारंभ प्रसंगी दरेकर भक्ति, मुद्गुल साक्षी, करुणा निकाळे, प्रियंका निकम, आरती चव्हाण, गायत्री निकम, निर्णय खैरनार, तेजस निकम या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या शिक्षकांप्रती आभार व्यक्त केले. विद्यार्थी मनोगतनंतर प्राध्यापक बी.एम. बैरागी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून यशाचे तीन कानमंत्र दिले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर आर.के. चांदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्राध्यापक आर. टी. टिळेकर यांनीही आपल्या मनोगतातून मुलांना प्रेरित केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य एन. ई. देवढे यांनी मुलांना जीवनाची त्रिसूत्री सांगितली व विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी व भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे ज्येष्ठ पर्यवेक्षक डी. टी. जोरे व के. जी. जोपळे, प्राध्यापक एस. एन. शेवाळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. के. जाधव, एस. व्ही. निकम, एस. व्ही. गंधे, सी. व्ही. अहिरे, एस. पी. गायकवाड व सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी व विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना निकम व गायत्री निकम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापक एस. डी. शिंदे यांनी केले.











No comments:

Post a Comment