Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 15 April 2023

माजी विद्यार्थी मेळावा - वर्ष 1994-95

 *विंचूर विद्यालयात माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणीत....*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय मध्ये वर्ष 1994-95 इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य एन.पी.सोनवणे व प्रमुख अतिथी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य एन.ई.देवढे तसेच उपस्थित माजी शिक्षक यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप पालवी यांनी केले. याप्रसंगी उपस्थित सर्व माजी शिक्षकांचा पुस्तक, शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय जुन्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांनी 70000 रुपये किमतीचे 35 ब्लॅकबोर्ड विद्यालयास भेट दिले. या कार्यक्रमासाठी बी.बी.मोकळ, पी.के.जेऊघाले, पी.जी.ढवण, एम.आर.दराडे, सी.टी.जाधव, बी.के.जाधव, पी.ए.सरोदे, गायकर सर तसेच माजी विद्यार्थी पांडुरंग शेळके, सचिन गलांडे, अशोक चव्हाण, नंदलाल दरेकर, संतोष नागरे, सुरेश काळे, गोरख सोनवणे, महेंद्र बेलगावकर, निलेश पुंड, पंकज निकम, मारुती दरेकर, योगेश वाजे, निलेश पारिक, शैलेश काळे, जयंत साळी, मुकुंदा जंगम, सुनिल नेवगे, वसंत उंडे, किरण बाहीकर, प्रकाश साळी, गणेश आहेर, अनिल दरेकर, अर्चना पाटील, सविता शेलार, अर्चना खैरे, भारती दरेकर, पुष्पा दरेकर, वनिता जथे, रोहिणी दुघड, रोहिणी पवार, संगिता घायाळ, मनिषा कानडे, नगमा बेग, अनिता जेऊघाले, सुवर्णा नेवगे, उज्वला शिरसाठ इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण जाधव व आभार प्रदर्शन डॉ. शैलेश काळे यांनी केले. शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.




































No comments:

Post a Comment