My Menus

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 15 May 2023

सन 1995-96 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

 *विंचूर विद्यालयात सन 1995-96 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.............*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये सन 1995-96 च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. सर्वप्रथम उपस्थित माजी शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दिवंगत माजी विद्यार्थी व शिक्षक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व माजी शिक्षकांचा व मान्यवरांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे,  लाइफ मेंबर आर.के.चांदे, स्कूल कमिटी सदस्य अनिल दरेकर यांनी स्नेह मेळाव्यानिमित्त सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक एन.पी.सोनवणे तसेच उपस्थित माजी शिक्षक बी.बी. मोकळ, ए.जी.पाटील, पी.जी.ढवण, आव्हाड सर, सी.टी.जाधव, सौ.ए.ए.पाटील यांनी देखील विद्यालयातील जुन्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील 3000 विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असा आर.ओ. वॉटर प्लांट विद्यालयास देण्याचे जाहीर केले. या कार्यक्रमासाठी, जयंत साळी, राहुल सालगुडे, मुकुंदा बाहीकर, दीपक चौधरी, नामदेव काकडे, परेश मालपाणी, सुभाष सोनवणे, गणेश शेवाळे, चंद्रकांत दरेकर, रवींद्र गोसावी, सुनिल शेलार, संतोष कल्याणकर, सुनिल क्षिरसागर, दीपक नेवगे, राजू नेवगे, हेमंत भागवत, रामेश्वर जेऊघाले, शिवाजी उगले, सतीश चौधरी, किशोर जेऊघाले, करीम तांबोळी, जनार्दन दरेकर, विलास ढोमसे, शरद जाधव, उत्तम जाधव, संदीप देशमुख, संतोष राऊत, दादासाहेब भागवत, चिंतामण सोनवणे, रावसाहेब उशीर, गणपत कातकाडे, दीपक गुंजाळ, अशोक दराडे, भाऊसाहेब सानप, भाऊराव दराडे, राधाकृष्ण सानप, प्रमोद राऊत, ज्ञानेश्वर गाडे, विजय वावधाने, संदीप सूर्यवंशी, विनोद रावल, ज्ञानेश्वर करमासे, अनिल काळे, गोरख दरेकर, मुकुंदा गायकवाड, संतोष औटे, राजू क्षिरसागर, संदीप मुदगुल, प्रकाश गायकवाड, शरद जेऊघाले, जालिंदर जेऊघाले, योगेश रायते, मनोहर दरेकर, भाऊसाहेब सानप, खुशाल कांदे, दत्तू वावधाने, ज्ञानेश्वर खांदोडे, संदीप खैरे, दिलीप नागरे, संतोष कांगणे, सुभाष सोनवणे, इरफान मोमीन, सारिका साळी, दिपाली मानकर, सविता ठुबे, माया गुंजाळ, मनीषा वाघ, सविता दरेकर, मालती पवार, माधुरी बोरसे, मीतल गगड, संगीता सांगळे, लता बोडके, सपना जाधव, सुरेखा सालगुडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंधाली गव्हाणकर यांनी केले.













No comments:

Post a Comment