Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 15 May 2023

उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे- सेवापुर्ती समारंभ

विंचूर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजेंद्र शिंदे यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न....

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य पंढरीनाथ दरेकर होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांनी शिंदे सरांचा संस्थेतील एकूण सेवाकाल आपल्या प्रास्ताविकातून सांगितला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचा शिंदे परिवारातर्फे शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सत्कार मूर्ती शिंदे सर यांचा विद्यालय व सेवकवृन्दांच्या वतीने शाल, श्रीफळ, पोशाख व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉक्टर सुजित गुंजाळ, माजी सहाय्यक विभागीय अधिकारी शिवाजी सोनार, माजी मुख्याध्यापक एन.पी.सोनवणे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, माजी विद्यार्थी विशाल आघाव, आबासाहेब दरेकर, माजी सहकारी लभडे सर, डी.आर.गायकवाड, उन्हावणे सर यांनी आपल्या मनोगताद्वारे शिंदे सर यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी अनिल दरेकर, विनायक जेऊघाले, ज्ञानेश्वर गाडे, युवराज होळकर, संदीप होळकर, जी.जी.पोफळे, व्ही.एम. सालगुडे, प्रविण ढवण, जी.एन.तेलोरे, बी.बी.पगारे, सी.डी.रोटे, के.बी.दरेकर, बागुल सी.जी., डी.यु.कापडणीस, एस.के.आहेर, ताम्हाणे सर, एस.बी.जाधव, सौ.जे.एस.जाधव, सौ.भदाणे एस.ए., श्रीम.चव्हाणके, सौ.संगीता शिंदे, गौरव शिंदे, सौरव शिंदे, आहिरे सर, संगमनेरे सर, गायकवाड सर, मनोहर साळी, शिंदे सरांचे नातेवाईक, आप्तेष्ट, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, विद्यालयाचे पर्यवेक्षक के.जी.जोपळे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लाईफ मेंबर आर.के.चांदे व आभार प्रदर्शन व्ही.सी.भोसले यांनी केले.










No comments:

Post a Comment