Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 16 June 2019

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा - १२ जून


विंचूर विद्यालयास माजी विद्यार्थ्यांकडून स्नेहमेळाव्याद्वारे २५०११ रु.देणगी....
विंचूर- येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सन २००१ ते २००३ च्या इयत्ता दहावी ते बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आनंदात संपन्न झाला. मेळाव्यास एकूण ४० माजी विद्यार्थी व १८ शिक्षक उपस्थित  होते. सुरुवातीस मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील, सरस्वती व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज सरोदे यांनी केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या माजी शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे भारतीय सेनेत कार्यरत असलेला माणिक कडलग यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी शेखर लोळगे यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी सन्मानचिन्ह भेटवस्तू म्हणून दिल्या. यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यानी आपला परिचय करून दिला व आठवणी कथन केल्या. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे , विद्यालयाचे उपप्राचार्य प्रविण ढवण व नवनियुक्त प्राचार्य एन.इ.देवढे यांनी स्नेहमेळावा, मैत्रीचे महत्व व विद्यालयास नेहमी सहकार्य करण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर माजी शिक्षक बी.बी.मोकळ, आर.एस. डोळे, एम.के.पिलगर, व्ही.एस.जगताप, के.बी.दरेकर, जी.एन.तेलोरे, पी.के.जेऊघाले, यु.बी. वर्पे, सी.व्ही.खेलूकर, बी.बी.पगारे, डी.यु.कापडणीस, एस.के.आहेर, एस.एम.भोईटे, जे.बी.साळी यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना आपले अनुभव कथन व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी प्राचार्य डी.सी.शेंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आई,वडील व गुरु यांचे जीवनातील महत्व सांगितले. शेवटी आभार प्रदर्शन किरण तिडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयसिंग दरेकर व जयश्री देवचित्ते यांनी केले. यानंतर विद्यालयात सोनाली शिंदे व आदींनी वृक्षारोपण केले. याप्रसंगी सर्व माजी विद्यार्थ्यांकडून नवीन इमारत बांधकामासाठी २५०११ रु रोख देणगी देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुदाम दरेकर, राजू दरेकर, अरुण दरेकर, अमोल कल्याणकर, भूषण गिरमे, संतोष सानप, मिलिंद वाघ, किरण क्षिरसागर यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी मनीषा पाटील, रुपाली पाटील, प्रियंका गायकवाड, कविता शिरसाठ, सोनाली सोनवणे, मीना क्षिरसागर, डॉ.कल्पना कतवारे, प्रविण आहेर, कुणाल पाटील, कृष्णा महाले, वरुण शिंदे, राजेंद्र दरेकर, रवि कडलग, अनिल चव्हाण, विशाल शिंदे, योगेश जगदाळे, राजेश भडांगे, विशाल गायकवाड, सागर रावल इ.माजी विद्यार्थी उपस्थित होते. 















































































































No comments:

Post a Comment