कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर चा इयत्ता १० वी चा निकाल ८३.४८ %
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा इयत्ता १०
वी मार्च २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला. परीक्षेला एकूण ३०२ विद्यार्थी
प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १०४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ११४ विद्यार्थी
प्रथम श्रेणीत तर ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत असे एकूण २५३ विद्यार्थी उत्तीर्ण
झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ८३.४८ टक्के लागला. विद्यालयात
प्रथम क्र.: - सांगळे ओंकार शिवाजी - ४६८ गुण = ९३.६० %
द्वितीय क्र:- काशीकर जयदीप
यशोदीप - ४४८ गुण = ८९.६० %
तृतीय क्र.:- कु.बोरसे साक्षी प्रविण
- ४४४ गुण = ८८.८० %
वरील विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे
व्हाईस चेअरमन भगिरथजी शिंदे साहेब, स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष
श्री.काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष श्री.कैलास सोनवणे, उत्तर विभाग सल्लागार समिती
सदस्य श्री.सुनिलभाऊ मालपाणी व श्री.नारायणे गुरुजी, तसेच सदस्य श्री.पंढरीनाथ
दरेकर, श्री.अनिल दरेकर, श्री.बाळकिसन मालपाणी, श्री.जगदीश जेऊघाले, श्री.काशिनाथ
शेवाळे, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शंकर दरेकर व विनायक जेऊघाले, विद्यालयाचे
प्राचार्य एन.ई.देवढे, तसेच माजी प्राचार्य जी.जी.पोफळे, उपप्राचार्य प्रविण ढवण,
संस्थेचे लाईफ वर्कर आर.के.चांदे, पर्यवेक्षक एस.पी.पगार व व्ही.व्ही.मापारी तसेच ग्रामस्थ
यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment