Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 17 August 2019

9 ऑगस्ट - क्रांती दिन

विंचूर विद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा........
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये 9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके होते. प्रास्ताविक समीक्षा ढवण या विद्यार्थिनीने केले. याप्रसंगी तृप्ती कदम, शरयू भोसले, श्रुती डुंबरे, युवराज घायाळ, समीक्षा जाधव, जान्हवी डुंबरे, अंकिता सोनवणे या विद्यार्थ्यांनी क्रांती दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे उपशिक्षक जे.पी.पाटील यांनी आपल्या मनोगतातून 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन वर्गशिक्षिका सौ.आर.पी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावी गुरुकुलच्या वर्गाने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती जेऊघाले व इंद्रायणी शेलार यांनी केले तर आभार प्रदर्शन आयुष साळी यांने केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचे विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, पर्यवेक्षक एस.पी.पगार व डी.टी.जोरे, लाइफ वर्कर आर.के. चांदे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी एम.एम.पवार, ए.एस.पवार , के.एम. निकम, मोनिका दळवी व विद्यार्थी उपस्थित होते.












No comments:

Post a Comment