विंचूर विद्यालयाचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुयश....
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिंपळगाव हायस्कूल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. यामध्ये 14 वर्षाखालील 38 किलो वजनी गटात इयत्ता नववीतील विद्यार्थी अमोल सोनवणे याने प्रथम क्रमांक मिळवला. तर 17 वर्षाखालील 46 किलो वजनी गटात इयत्ता नववीतील परवेज शेख या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धांमध्ये ज्ञानेश्वर काकड, अक्षय काळे, कार्तिक सानप, अभिषेक कातकाडे, आदित्य वारुंगसे, संकेत जाधव, अभिषेक कांगणे, साहिल नागरे, विपुल गोराणे, ज्ञानेश्वर जाधव, कृष्णा लांडबले व शाम इघे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी सर्व स्थानिक सल्लागार समिती सदस्य, ग्रामस्थ, हितचिंतक, विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी. पगार व डी.टी.जोरे, लाइफ वर्कर आर.के.चांदे, उपशिक्षक व्ही.सी.भोसले, पी.ए.सरोदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व क्रीडा विभाग प्रमुख के.जी.जोपळे सरांचे हार्दिक अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment