Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, 4 August 2019

माता पालक संघ

विंचूर विद्यालयात माता पालक संघाची स्थापना..........

उपाध्यक्षपदी सौ. अर्चना मोहन दरेकर यांची निवड
                         विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठीची माता पालक संघाची स्थापना करण्यात आली. प्रारंभी सरस्वती व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील उपशिक्षिका सौ.एस.ए.खरात यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संघाच्या सचिव श्रीम.व्ही.एस.कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व माता पालक शिक्षक संघाच्या स्थापनेचा हेतू, उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली. माता पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य एन.ई.देवढे , उपाध्यक्ष सौ. अर्चना मोहन दरेकर , सचिव- श्रीम.व्ही.एस.कुलकर्णी, सहसचिव-सौ.रेखा किरण गिरमे व सौ.कांता सुनिल गाडेकर तसेच पालक सदस्य म्हणून सौ.सोनाली रामेश्वर करमासे यांची निवड करण्यात आली. याचबरोबर मागील वर्षातील कार्यकारिणीचे आभार व्यक्त करण्यात आले व नवीन कार्यकारिणीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.  विद्यालयाचे उपशिक्षक व संस्थेचे लाइफ वर्कर आर.के.चांदे यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. तसेच विद्यालयाचे प्राचार्य यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे पालकांचे शंकानिरसन केले. शेवटी विद्यालयाच्या उपशिक्षिका जे.व्ही.काळे यांनी आभार  प्रदर्शन केले. मेळावा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल उपमुख्याध्यापक डब्ल्यू.एन. घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार व डी.टी.जोरे यांनी अभिनंदन केले.







No comments:

Post a Comment