My Menus

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 17 August 2019

१५ ऑगस्ट - स्वातंत्र्यदिन

विंचूर विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..............

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य मा.सुनिल मालपाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीते सादर केली. त्यानंतर तंबाखू मुक्त अभियान अंतर्गत तंबाखू मुक्तची सर्वानी शपथ घेतली. तसेच स्काऊट गाईड व एमसीसी संचलनाद्वारे ध्वजास मानवंदना देण्यात आली. यानंतर गावातून विविध घोषणा व ढोलताशांच्या गजरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस याप्रसंगी साजरा करण्यात आला. तसेच  ग्रामस्थ, गावातील दानशूर व्यक्तीं व माजी विद्यार्थ्यांकडून याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ व गोळ्या वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य निफाड संजय शेवाळे, इफको संचालिका साधनाताई जाधव, स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष कैलास सोनवणे, सदस्य- माधवराव नारायणे, जगदीश जेऊघाले, पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष शंकर दरेकर व विनायक जेऊघाले, ग्रामस्थ मधुकर दरेकर, दिनकर चव्हाण, के.के.जेऊघाले, भास्कर परदेशी, बाळासाहेब निकाळे, शांताराम दरेकर, कुशारे सर, अशोक दरेकर, ज्ञानेश्वर गाडे, मधुकर पाडवी, सचिन जेऊघाले, किरण नवले, प्रविण सालगुडे, ज्ञानेश्वर सोनवणे, आबा दरेकर, किशोर नेवगे, अफजल शाह, सौ.अरुणा राऊत, नंदिनी क्षिरसागर, आरती जाधव, भारती जेऊघाले, मंदाकिनी आहेर, सैन्यदलातील जवान धनंजय पोतले, माजी विद्यार्थी राजेंद्र दरेकर, सुदाम दरेकर, किरण तिडके, शेखर लोळगे, हरीश कांगणे,  योगेश दरेकर, गणेश दरेकर, जनार्दन चव्हाण, सतीश सोनवणे, अक्षय थोरात, ओंकार थोरात, अनिरुद्ध जेऊघाले, सिकंदर बागवान, विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी उपस्थित होते. प्रभातफेरीचे संचालन के.जी.जोपळे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे लाईफ वर्कर आर.के.चांदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल प्राचार्य एन.ई.देवढे, उपमुख्याध्यापक डब्लू.एन.घोडके, पर्यवेक्षक एस.पी.पगार, डी.टी.जोरे, प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक आव्हाड सर, यांनी सर्वांचे आभार मानले.







































































































No comments:

Post a Comment