विंचूर विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा......
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये 15 ऑक्टो डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक वाल्मीक घोडके यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी कु. प्रीती कदम, वैभवी पवार व शुभम सोनवणे यांनी वाचनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. विद्यालयाचे उपशिक्षक जगदीश पाटील यांनी वाचन प्रेरणा दिन व जागतिक अंध दिनानिमित्त निमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ग्रंथपाल पद्मावती शेलार यांनी विद्यार्थ्यांना वाचनीय पुस्तके देऊन वाचनास प्रेरणा दिली. यानंतर आरोग्य समिती प्रमुख अनुराधा पवार यांनी जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक व अस्वच्छतेमुळे होणारे आजार याबद्दल सविस्तर माहिती दिली. यानंतर सर्वांनी स्वच्छतेबाबतची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु.कोयल साळवे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य नंदकुमार देवढे, पर्यवेक्षक सतिश पगार व ज्ञानदेव जोरे, लाइफ वर्कर राजेंद्र चांदे यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment