Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 5 October 2019

कराटे स्पर्धेत सुयश

विंचूर विद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड....


पिंपळनेर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय तेंग सुडो कराटे स्पर्धेमध्ये विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थी मोनिका दरेकर, शुभम दरेकर आणि ईशा कबाडी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवित उज्वल यश संपादन केले. त्यांची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल स्थानिक सल्लागार शिक्षण समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके, पर्यवेक्षक सतीश पगार आणि ज्ञानदेव जोरे, संस्थेचे लाइफ वर्कर राजेंद्र चांदे, क्रीडा विभाग प्रमुख कैलास पारधी,  काशिनाथ जोपळे, विजय भोसले, जगदीश पाटील, पंकज सरोदे, अर्चना पवार, जयश्री सोनवणे, अनुराधा पवार, क्रांती निकम, अरुण पवार, बालिका नागणे यांनी अभिनंदन केले.










No comments:

Post a Comment