Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, 20 March 2020

जागतिक महिला दिन

*विंचूर विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा....*


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम अध्यक्ष निवडीची सूचना स्वप्नाली राऊत हिने मांडली. सदर सूचनेला साक्षी नेवगे हिने सर्वानुमते अनुमोदन दिले. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका व कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले, जिजाऊ, लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम क्षिरसागर याने केले. त्यानंतर गोपाळ मुद्गुल, कल्याणी सानप, समृद्धी महाले या  विद्यार्थ्यांनी महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे महत्व विविध कविता, गाणी व भाषणातून व्यक्त केले. प्रा.पोपट आहेर यांनी महिला दिनाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.सविता गंधे यांनी स्त्रीची विविध रूपे व भूमिका अध्यक्षीय भाषणातून मांडली. उच्च माध्यमिक विभागाने सादर केलेल्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाल्मिक घोडके, पर्यवेक्षक ज्ञानदेव जोरे, सतिश पगार, लाईफ वर्कर राजेंद्र चांदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जाधव व प्रांजल दरेकर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन कांचन खैरे हिने केले.




























No comments:

Post a Comment