Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 13 June 2017

एस.एस.सी.मार्च २०१७ :- निकाल

एस.एस.सी.मार्च २०१७ :- निकाल

विंचूर विद्यालयात एसएससी परीक्षेत मुलांची बाजी.......
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथील मार्च २०१७ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. परीक्षेस एकूण ३०८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा शेकडा निकाल ९१.८८ इतका लागला. यापैकी १२३ विद्यार्थी विशेष प्रविण्यात, १०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व ४ विद्याथी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक
1) थोरात अक्षय सुनिल  96.80
2) कडलग विराज श्रीहरी 95.80
3) शेवाळे संदिप सतिश 95.60
मुलींमध्ये प्रथम कु.क्षिरसागर वैष्णवी राजेंद्र हिला ९२.८० इतके गुण मिळाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब गुंजाळ, उपाध्यक्ष श्री.कैलासशेठ सोनवणे व  सदस्य श्री.सुनिल मालपाणी, श्री.नारायणे गुरुजी, श्री.गोपीनाथ ढवण, श्री.पंढरीनाथ दरेकर, श्री.जगदीश जेऊघाले, श्री.बाळकिसन मालपाणी, श्री.काशिनाथ शेवाळे यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment