Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday, 27 December 2017

शालेय आरोग्य तपासणी

शालेय आरोग्य तपासणी

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आरोग्य तपासणी संपन्न :-
                     राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व सर्व शिक्षा अभियान तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय निफाड येथील डॉ.विशाल जाधव व डॉ.शुभांगी भारती यांनी विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी अखेर  सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. आरोग्य तपासणीत आढळून आलेल्या दोषपूर्ण विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे संदर्भित करण्यात आले. या आरोग्य तपासणीत डॉ.विशाल जाधव यांनी मुलांना सकस आहार, व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता इ.विषयी प्रबोधन केले व विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.शुभांगी भारती यांनी इयत्ता ८ वी ते १२ वी अखेरच्या विद्यार्थिनीना वैयक्तिक आरोग्य स्वच्छताविषयी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे उपशिक्षक श्री.खोंडे आर.सी. यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. यांनी डॉ.विशाल जाधव व डॉ.शुभांगी भारती यांचे आभार मानले.

















No comments:

Post a Comment