Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, 5 March 2018

क्रीडा स्पर्धेत सुयश

विंचूर विद्यालयातील कातकाडे श्रुतीचे दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुयश..............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील इयत्ता ६ वी तील विद्यार्थिनी कु. कातकाडे श्रुती अतुल हिने नुकत्याच पार पडलेल्या सर्व शिक्षा अभियान – समावेशित शिक्षण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हा परिषद नाशिक अध्यक्ष चषक स्पर्धा सन २०१७.१८ अंतर्गत १०० मी.धावणे या क्रीडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. याबद्दल तिला चषक, अक्षरगाणी पुस्तक व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाबद्दल क्रीडाशिक्षक श्री.पाटील के.डी., विभागप्रमुख सौ.निकम के.एम., प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी., सर्व सेवक, ग्रामस्थ व सल्लागार समिती सदस्य यांनी याप्रसंगी तिचे कौतुक व अभिनंदन केले.






No comments:

Post a Comment