Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday, 14 April 2018

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.............
                  विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात १४ एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजर करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी कु.अनुजा गाडेकर, कु.तेजस्विनी थोरात, कु.आश्विनी जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयातील उपशिक्षक व कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री.जे.पी.पाटील सर यांनी आंबेडकर यांचे सामाजिक व राजकीय कार्य आणि त्यांचे जीवनचरित्र याबद्दल आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व शेवटी आभार प्रदर्शन विद्यालयातील उपशिक्षक श्री.चांदे आर.के. यांनी केले.या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी., पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.






















No comments:

Post a Comment