मा. शरदचंद्रजी पवार साहेब - वाढदिवस दि.१२.१२.२०१८
विंचूर विद्यालयात शरद चंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा.....
विंचूर
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,
भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व विद्यमान खासदार मा.श्री.शरदरावजी पवार
साहेब यांचा ७८ वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शुभम
सोनवणे, कु.चंदन जाधव या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कोयल साळवे हिने केले तर आभार प्रदर्शन
उपशिक्षक जे.पी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे
उपप्राचार्य प्रविण ढवण होते. याप्रसंगी व्यासपिठावर ज्येष्ठ शिक्षक वर्पे
सर, एस.एन.शेवाळे, पी.बी.आहेर, ए.एस.पवार, एन.ए.पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता ११ वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी
केले त्यांना प्राध्यापिका एस.व्ही.गंधे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम
यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य जी.जी.पोफळे यांनी सर्व
विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment