Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 1 February 2023

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

 *विंचूर विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी....*        

रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम नेताजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे होते.  प्रास्ताविक पूनम परदेशी या विद्यार्थिनीने केले. दिव्या गुंजाळ, अक्षदा मुदगुल, दर्शना जाधव, वैष्णवी हिलाल, सोनाली शिंदे, लावण्या शेलार,अल्तमश सैय्यद , सोहम मोरे, सृष्टी जेऊघाले, श्रावणी राऊत या विद्यार्थिनींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ , डॉ. चांदर, टी.व्ही.9 चे प्रतिनिधीचे उमेश पारिक, उपमुख्याध्यापक आर.व्ही.शिंदे, संस्थेचे लाईफ मेंबर आर.के. चांदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी. जोपळे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेजल वाघचौरे व आभार प्रदर्शन सलिना शेख हिने केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन इ 6 वी ड चा वर्ग आणि वर्गशिक्षक जी.आर. पाडवी यांनी केले.


















No comments:

Post a Comment