Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 1 February 2023

स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर

 *विंचूर विद्यालयात स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न.....*

विंचूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवप्रताप कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ वेळापूर यांच्या सौजन्याने भव्य मर्दानी खेळ व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत विद्यार्थ्यांना भारतीय व्यायाम पद्धती, लाठी - काठी, भाला, तलवार, पट्टा चालवणे तसेच शस्त्राशिवाय स्वतःचा बचाव कसा करावा इत्यादी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या प्रात्यक्षिकांमध्ये ज्ञानेश्वर पवार, सुरेश कुटे, गणेश ठाकरे, मंगेश शिंदे तसेच त्यांच्या समवेत असलेले प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ, उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य सुनिलभाऊ मालपाणी, विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे, लाईफ मेंबर आर.के.चांदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, के.जी.जोपळे, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


























No comments:

Post a Comment