Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 15 April 2023

राष्ट्रीय विज्ञान दिन- 28फेब्रु

 *विंचूर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा.......*

रयत शिक्षण संस्थेच्या विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी एम.पी.एस.सी. मार्फत महापारेषण मध्ये असिस्टंट इंजिनियर वर्ग 2 साठी निवड झालेला विद्यालयाचा माजी विद्यार्थी सागर धात्रक व त्याचे वडील वसंत धात्रक यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एन.ई. देवढे होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने विज्ञानाचे चमत्कार व महत्त्व मानवी महाले, शरयू भोसले, इंद्रायणी शेलार, जान्हवी डुंबरे, ईश्वरी चतुर, गायत्री जाधव, ज्ञानदा ठुबे, लक्ष्मी मोहिते, मयुरी वाघ, धनश्री दरेकर, वैष्णवी भोसले, प्रणव देसले, शुभम नागरे, साहिल दरेकर, श्रुती डुंबरे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याद्यापक आर व्ही शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, लाईफ मेंबर, आर.के.चांदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवानी गुंजाळ हिने केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन इयत्ता नववी अ चे वर्गशिक्षक एस.व्ही. शिंदे व विद्यार्थी यांनी केले.
















No comments:

Post a Comment