Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 15 April 2023

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

 *विंचूर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...*

            विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे प्राचार्य एन.ई.देवढे यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूनम बुचकुले हिने केले. त्यानंतर गायत्री गवळी, चेतन झेटे, उर्मिला माळी, कावेरी सानप, वैष्णवी भोसले, श्रद्धा साळवे, शितल हरळे, साक्षी हरळे, निर्जला कडलग, पवन पोमणे, सानिका क्षिरसागर, गायत्री डुंबरे, वेदांत वाघ या विद्यार्थ्यांनी छत्रपतींच्या जीवन कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिवरायांवर विविध वेशभूषा, पोवाडे, समूहगीत, समूह नृत्य, राज्यगीत गर्जा महाराष्ट्र माझा, सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक आर टी टिळेकर यांनी अध्यक्षीय मनोगतून शिवरायांचे चरित्र व शिवजयंतीचे महत्व पटवून दिले केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.व्ही. शिंदे, पर्यवेक्षक डी.टी.जोरे, संस्थेचे लाइफ मेंबर आर.के.चांदे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिव्या मघाडे हिने केले. कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता आठवी ड चे विद्यार्थी व वर्गशिक्षिका सौ.पवार ए.ए. यांनी केले.






























No comments:

Post a Comment