आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2018
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.............विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील २५०० विद्यार्थ्यांनी योगासने करण्यात सहभाग घेतला. प्रथम योगप्रशिक्षक श्री.किशोर पाटील व श्री.विजय लोहारकर तसेच उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी. व पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. व जेष्ठ्शिक्षक श्री.ढवण पी.जी., श्री.पाटील के.डी., श्री.गवळी एन.पी, श्री.चांदे आर.के. यांनी श्री.श्री.रवीशंकर व कर्मवीर आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून पद्मासन, मकरासन, चक्रासन, हलासन, ताडासन, मयुरासन, धनुरासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, शीर्षासन आदी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. त्यानंतर सूर्यनमस्कार व मेडीटेशन (ध्यानधारणा) करण्यात आले.
No comments:
Post a Comment