नवीन विद्यार्थी स्वागत व गुणवंतांचा सत्कार
दिनांक १५ जून २०१८ - शुक्रवार
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन
विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंतांचा सत्कार ..............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शाळेच्या
पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत व गुणवंतांचा सत्कार करण्यात
आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सल्लागार समिती उपाध्यक्ष श्री.कैलासशेठ सोनवणे
होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन
करण्यात आले. तसेच नवनियुक्त प्राचार्य श्री.पोफळे जी.जी. यांचे शाल व श्रीफळ देऊन
स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मोफत पुस्तकांचे देखील वाटप करण्यात
आले. एसएससी मार्च २०१८ परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक कु.वाघ दीक्षा, बोडके आदित्य,
कु.कानडे ऋतुजा तसेच गणितात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या कु.कानडे ऋतुजा बाजीराव
यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एचएससी फेब्रु २०१८ परीक्षेतील कला शाखेतील प्रथम
तीन क्रमांक कु.आरगडे शिवानी, कु.गवळी जागृती, कु.निकम मनिषा व विज्ञान शाखेतील प्रथम
तीन क्रमांक कु.मोरे कांचन, कु.गडाख प्रियल, कु.ठाकरे अंकिता यांचा देखील
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचबरोबर NMMS परीक्षा शिष्यवृत्ती पात्र
विद्यार्थिनी कु.सानप गायत्री व कु.दिवटे मृणाल यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव
करण्यात आला. याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य पंढरीनाथ दरेकर व पालक श्री.क्षीरसागर,
श्री.बाजीराव कानडे, श्री.अशोक दरेकर, श्री.ज्ञानेश्वर दरेकर, श्री.आबा दरेकर व
ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के. यांनी
केले.
No comments:
Post a Comment